WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Vihir Anudan Yojana

sarkari yojana app मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे ज्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यापैकी एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा.

राज्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी नवीन विहिरीचा खोदकाम याचबरोबर जुन्या विहिरीचे दुरुस्ती, शेततळे, वीज जोडणी, विहिरीवरील मोटार संच, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण अशा विविध बाबींचा लाभ दिला जातो आणि या योजनेमध्ये अखेर सुधारणा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

sarkari yojana app

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈

ह्या अटी रद्द

sarkari yojana app बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी 12 मीटर खोलीचे अट घालण्यात आली होती ही आता रद्द करण्यात येणार आहे.
याप्रमाणे 2 सिंचन विहिरीमधील 500 फुटाचे अंतर ह्या अटी मुळे देखील अनेक लाभार्थी बाद होत होते अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडे जमिनीचे उपलब्धता कमी असल्यामुळे 500 फूट अंतराचे अट मेंटन ठेवणे अतिशय कठीण होते बरेच लाभार्थी या अटीमुळे बाद केले जात होते आणि आता ही अट देखील रद्द करण्यात आली आहे.

हे ही पाहा : शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष मोफत वीज, बळीराजा मोफत वीज योजना 2024

अनुदानात झाली भरमसाठ वाढ

नवीन सिंचन विहिरीला 2.5 लाख रुपयापर्यंत दिले जाणारे अनुदान आता 4 लाख रुपये करण्यात येणार आहे.
जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांचे अनुदान आता 1 लाख रुपयाचे दिले जाणार आहे.
इनवेल बोरिंगसाठी 20 हजार ऐवजी आता 40 हजार रुपयांचे अनुदान दिला जाणार आहे.
मोटर संच किंवा इतर यंत्रसामग्री साठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिला जाणार आहे.
परसबागेकरता दिल्या जाणाऱ्या अनुदान हे आता 5 हजार रुपये करण्यात येणार आहे.
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपयाचा दिल्या जाणारे अनुदान आता 2 लाख किंवा प्रत्यक्ष कर्जाच्या 90% पर्यंत दिल्या जाणार आहे. sarkari yojana app

👉शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

sarkari yojana app तुषार सिंचनसाठी योजना अंतर्गत 25 हजार रुपयापर्यंत अनुदान दिला जात होते याऐवजी आता तुषार सिंचन खरेदीसाठी 47 हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% यापैकी जे कमी असेल ते अनुदान लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकऱ्यांना 97 हजार रुपये किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पैकी जे कमी असेल ते अनुदान लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

हे ही पाहा : कुछ मिनटों में नाबार्ड से मिलेगा डेयरी फार्म का लोन, घर बैठे ऐसे करें आवेदन

अशा प्रकारे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सुधारणा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि या संदर्भातील जे अटी शर्ती असतील ते शासन निर्णयाच्या माध्यमातून योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली जाणार आहे.

महिलाओं को बिना ब्याज के मिल रहा 5 लाख रुपये का लोन


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!