WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
animal ear tags सरकारची मोठी अपडेट हे नाही केले तर मदत विसरा नवा नियम 1 जूनपासून होणार लागू

animal ear tags लम्पीसारख्या साथीच्या आजारानंतर पशुसंवर्धन विभागाकडून महत्वाचे पाऊल उचलण्याचे काम सुरू आहे. आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड च्या धरतीवर पशुंसाठी ईअर टॅगिंग केले जात आहे.

सुदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी १ जून पासून प्रत्येक पशूचे ईअर टॅंगिंग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत राज्यभरात मोहीम राबवण्याचे काम सुरू आहे.

animal ear tags

👉आतच बसवा आपल्या पशूला एअर टॅग👈

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

किसानों के लिए खुशखबरी! इस खेती पर सरकार दे रही 40% की सब्सिडी

राज्यात येत्या १ जून २०२४ पासून तर ईअर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात येणार आहे. पशुंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व पशुपालकांना नियमीतपणे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Agrosolution

विश्वकर्मा योजना 2024, एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळवायचं, जाणून घ्या

जनावरे विक्री बाजारातही बंधनकारक animal ear tags

बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे. दिनांक 1 जून 2024 पासून तर ईअर टँग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे.

bad cibil loan app list

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

animal ear tags ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था,दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही मिळणार नाहीत. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई शेतकरी वंचित राहणार आहे. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!