WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahatma Phule Arogya Yojana : तब्बल 16 लाख नागरिकांना मोफत उपचार; केशरी, पिवळ्यासह पांढऱ्या रेशनकार्ड धारकालाही मिळणार लाभ

Mahatma Phule Arogya Yojana महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा (Mahatma Phule Jan Arogya Yojana) लाभ आता सर्व रेशनकार्डधारकांनाच (Ration Card) मिळणार आहे. शासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीच मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे १ जुलैपासून या योजनेअंतर्गत अंतर्भूत असलेल्या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत.

आता या योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकूण ४ लाख २६ हजार ५९९ रेशनकार्डवरील १६ लाख ६१ हजार ५६२ नागरिकांना मिळणार आहे. पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मात्र आपले रेशनकार्ड ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. Mahatma Phule Arogya Yojana महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार (Treatment) मोफत होत होते; मात्र, त्यात २०१९ मध्ये सुधारणा करण्यात आली.

Agrosolution

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

त्यानुसार ही योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अशा एकत्रित योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळू लागले आहेतच; पण आता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. यात हृदयाचे आजार, कर्करोगविषयक शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, मेंदूविषयक आदी आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.

उपचार किंवा शस्त्रक्रियांचा पाच लाखांपर्यंतचा खर्च शासन करणार आहे. यात ३३ विशेष रोगांकरिता कॅशलेस उपचार आणि शस्त्रक्रिया उपचार मोफत होणार आहेत. यात उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे. पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्डधारक यांनाही या योजनांचे लाभ मिळणार आहेत.

Agrosolution

महज 5 मिनट में मिलेगा 2 लाख तक का लोन!

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचारांचा लाभ आता सर्वच नागरिकांना मिळणार आहे. त्यासाठी सर्वच रेशनकार्डधारकांनी आपले रेशनकार्ड लवकरात लवकर ऑनलाइन करावे. Mahatma Phule Arogya Yojana

दृष्टिक्षेपात

महात्मा फुले जनआरोग्य योजना

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

५ लाखांपर्यंत मोफत उपचार

शासकीयबरोबर १२ खासगी रुग्णालयांचा समावेश

ऑनलाइन कार्ड होणे गरजेचे

मोफत उपचारासाठी रेशनकार्डावरील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक रेशनकार्डला लिंक केल्यानंतर १२ आकडी नंबर मिळतो. अशा ऑनलाइन झालेल्या कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही प्रक्रिया त्यातील सर्वांत महत्त्वाची असल्याने त्यासाठी आता लोकांनी धावाधाव सुरू केली आहे. त्यासाठीही सेतूमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

Agrosolution

आधार कार्ड से कैसे लें Loan? इन स्टेप्स को फॉलो करके आसानी से मिल जाएगा पैसा

जिल्ह्यातील कार्डधारक लाभार्थी

प्रकार रेशन कार्ड लाभार्थी Mahatma Phule Arogya Yojana

  • अंत्योदय ३८,८५० १,३३,८६६
  • प्राधान्य (केशरी) ४४,८१४ १,६२,२३१
  • एपीएल (केशरी) ९९,००२ ३,६८,७४०
  • एपीएल (पांढरे) २,४४,२८९ ९,९६,६६५
  • एकूण ४२६९५५ १६,६१,५०२

…या रुग्णालयात मोफत उपचार

जिल्हा शासकीय रुग्णालय, कामथे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय या सरकारी रुग्णालयांबरोबरच वालावलकर रुग्णालय डेरवण, रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, परकार हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, लाइफकेअर हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण, एसएमएस हॉस्पिटल चिपळूण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत.

Agrosolution

अपने सिबिल स्कोर को चैक किए बिना 50,000 रुपये का लोन कैसे प्राप्त करें


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!