WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
bangalore refinery gold price सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात २४ तासांत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

Ranka gold rate today नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांमध्येही दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. २४ तासांपूर्वी २१ जून २०२४ रोजी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी बघायला मिळाली होती.

परंतु दुसऱ्याच दिवशी हे दर प्रति दहा ग्राम सुमारे १ हजार ते १,२०० रुपयांनी खाली घसरले आहे. त्यामुळे शनिवारी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Agrosolution

सुकन्‍या समृद्धि पर बड़ा अपडेट, सरकार के ताजा फैसले के बाद कितना मिलेगा ब्‍याज?

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिली जातात. त्यामुळे आताही या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे.

त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २२ जूनला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ७१ हजार ८००, २२ कॅरेटसाठी ६६ हजार ८००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ७०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८९ हजार रुपये होता.

Agrosolution

काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

Ranka gold rate today दरम्यान नागपुरात २१ जूनला सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १०.३० वाजता सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ७३ हजार रूपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ९००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ०० रुपये होता. त्यामुळे २२ जूनच्या तुलनेत २१ जून २०२४ रोजीचे दर बघितल्यास नागपुरात सोने- चांदीच्या दरात चांगलीच घसरण बघायला मिळत आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर

वरील आकडेवारीनुसार २४ तासांत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो २ हजार ४०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Agrosolution

किसानों के लिए बड़ी खुशखबरी, 31,000 करोड़ लोन माफ करने पर लगी मुहर

Ranka gold rate today दरम्यान नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी सध्या सोने- चांदीच्या दरात घट झालेली दिसत असली तरी ती लवकरच वाढण्याचे संकेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या घसरलेले दर ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी असल्याचा त्यांचा दावा आहे


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!