online jobs for 12th pass बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. ऐसी ही खबरें देखने के लिए यहां क्लिक करें
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची मेगाभरती सुरु आहे. याअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 5 हजार 347 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदासाठी लागणारी शेक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
online jobs for 12th pass
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकच्या एकूण 5 हजार 347 जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे आयटीआयचे सर्टिफिकेट असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे.
एकूण 5 हजार 347 पदांसाठी भरती
online jobs for 12th pass विद्युत सहाय्यक पदासाठी अनुसूचित जाती संवर्गातून 673,अनुसूचित जमाती-491, विमुक्त जाती (अ)-150, भटक्या जाती (ब)-145, भटक्या जाती (क)-196, भटक्या जाती (ड)-108, विशेष मागास प्रवर्ग-108, इतर मागास प्रवर्ग-895, ईडब्ल्यूएस-500 तर खुल्या गटातील 2 हजार 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये 40000 पदांसाठी बंपर भरती
अर्ज शूल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून यासाठी 250 + GST इतके शुल्क घेतले जाणार आहे. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल आणि अनाथ घटकांतील उमेदवारांना यात थोडी सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून 125 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.
असा करा ऑनलाइन अर्ज online jobs for 12th pass
इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 20 जुन 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना महावितरणची अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/ वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
बिजनेस के लिए सरकार दे रही है 10 लाख रुपए लोन, ऐसे करें आवेदन
वेतन
विद्युत सहाय्यक प्रथम वर्षासाठी 15 हजार, द्वितीय वर्षासाठी 16 हजार तर तृतीय वर्षासाठी 17 हजार इतके मानधन दिले जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्ज लक्षपूर्वक भरा. त्यात काही त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी घ्या.अन्यथा अर्ज बाद करण्यात येईल.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.