WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
govt schemes for farmers

govt schemes for farmers जळगाव जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला अधिक तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादक संकटात सापडले होते मात्र केळी उत्पाद‌कांना झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीकडून आता भरपाई दिली जाणार आहे. कमी तापम ानासाठी किमान २६ हजार ५०० तर अधिक तापमानासाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

तालुक्यात पाच वेळा नैसर्गिक आपत्ती येऊन वर्ष झाले आणि सप्टेंबर महिन्यात आलेल्या पूर अतिवृष्टीने केळीचे नुकसान होऊन आठ महिने उलटले तरीही संबंधित विमा कंपनीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित अशी १२ कोटी रुपयांची भरपाई अजूनही दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत यावर चर्चा झाली, आश्वासने दिली गेली, मात्र तशी अंमलबजावणी अजूनही न झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. (Natural disaster on banana 5 times in previous years in district )govt schemes for farmers

govt schemes for farmers

गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार

तालुक्यात २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ वेळा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूर यामुळे केळीसह कोरडवाहू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल, मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात हे नुकसान झाले असून, त्यात २४६ गावातील ८४२२ शेतकऱ्यांचे ५६५३ हेक्टर्स केळीसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना विमा भरपाईपोटी १२ कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे.एरवी विमा हप्ता एकच दिवस उशिरा भरल्यानंतरही विमा कंपनी नंतर हप्ता स्वीकारत नाही, विमा कंपनीचे आर्थिक व्यवहार एक दिवसही उशिरा पूर्ण केले तर दंडात्मक कारवाई होते. इथे मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांची भरपाई किमान ८ महिन्यांपासून प्रलंबित असून, लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देत आहेत. (latest marathi news)

Agrosolution

किसानों के लिए खुशखबरी! इस खेती पर सरकार दे रही 40% की सब्सिडी

ही वादळ आणि पूर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई केव्हा मिळेल याबाबतही विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा अधिकारी स्पष्ट सांगत नाहीत. ती मिळेल किंवा नाही अशीही शक्यता केळी उत्पादक व्यक्त करीत आहेत. याशिवाय अजूनही शेकडो शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याच्या हवामानानुसार किमान व कमाल तापमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही प्रलंबित आहे.

काय आहेत निकष..

■ फळ पीक विमा काढलेल्याकेळी उत्पादकांना जास्त व कमी तापमानामुळे केळीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.

Agrosolution

ऐसी ही खबरें देखने के लिए यहां क्लिक करें

■ १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सलग ३ दिवस पारा ८ अंश किंवा त्यापेक्षा कमी वर गेला, हेक्टरी २६ हजार ५०० रुपयांची भरपाई मिळते.

■ सलग पाच दिवस पारा ४२ अंशाच्या पुढे राहिला तर ३६ हजार रुपयांची भरपाई मिळते.मार्च व एप्रिल महिन्यात

■ मे महिन्यात सलग तीनदिवस पारा ४५ अंशाच्या पुढे राहिला तर ४४ हजार रुपयांची भरपाई मिळते


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!

Discover more from Agrosolution

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading