maharashtra yojana नांदेड, हिंगोली, परभणी पाठोपाठ जालना जिल्ह्याचा देखील 25 टक्के पिक विमा मंजूर झालेला आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
maharashtra yojana
जालना जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती मोठ्या प्रमाणात शेती पिकांचा नुकसान झाले आणि या पार्श्वभूमी वर जिल्ह्यामध्ये झालेल्या एकंदरीत नुकसान आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या पिक विमा नुकसानेच्या दाव्याच्या संदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने या जिल्ह्यांमध्ये रँडम सर्वेक्षण करण्यात आलेला आहे.
या करण्यात आलेल्या रँडम सर्वेक्षण मध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आणि या पार्श्वभूमी वर जालना जिल्हास्तरीय पिक विमा समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये 25 टक्के पिक विमा मंजूर करण्यासंदर्भातील एक अधिसूचना निर्गमित करून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पीक विम्याची एका महिन्याच्या आतमध्ये वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसे प्रकारचे अधिसूचना निर्गमित करण्यात आले आहे.
हे ही पाहा : राज्यातील 7000 गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
3 लाख शेतकऱ्यांना 412 कोटीचा निधी
maharashtra yojana जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस असे विविध पिकांचे नुकसान झाले आणि यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक नुकसानीचे दावेदेखील दाखल करण्यात आले होते.
जालना जिल्ह्यातील जवळजवळ 3 लाख शेतकऱ्यांना 412 कोटी रुपयांचा पिक विमा 25% अग्रि म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे.
दिवाळी पूर्वीच होणार विम्याचे वितरण
या संदर्भातील अधिसूचना लवकरच उपलब्ध करून दिले जाईल ज्यामध्ये कोणत्या कोणत्या मंडळामध्ये किती टक्के नुकसान दाखवण्यात आले, कोणत्या कोणत्या पिकासाठी कोणती मंडळ पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती दिली जाईल.
या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच या 25% पीक विमाच वितरण केले जाणार आहे.
हे ही पाहा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024
maharashtra yojana राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे आणि यामध्ये प्रत्येक नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये आधी सूचना निघणे अपेक्षित होते. ज्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये आधी सूचना काढण्यात आले होते आणि या पाठोपाठ आता जालना जिल्ह्याचे देखील आधी सूचना निर्गामित करण्यात आले आहे.
या संदर्भातील इतर काही अपडेट किंवा इतर जिल्ह्याच्या संदर्भातील काही नवीन अपडेट उपलब्ध झाल्यानंतर त्याच्याबद्दल देखील नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.
हे ही पाहा : तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.