WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gharkul yojana 2024

gharkul yojana 2024 राज्यातील नवीन घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या याचबरोबर घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षात असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

24 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे याचबरोबर राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सातारा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नवीन घरकुलाला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाचे शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

gharkul yojana

👉योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा👈

मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी मंजूर

gharkul yojana 2024 मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातील बऱ्याच लाभार्थ्यांची घरकुल मंजूर झालेली आहे.
पहिल्या वितरण झालेल्या काही लाभार्थ्यांना 2 हप्ते मिळाले आहेत पुढचे जास्त वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 750 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

यापूर्वीच्या योजनेसाठी 1300 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले होते आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून योजनेसाठी 750 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही पाहा : बिना दस्तावेज़ों के पाए 30,000 रुपये का लोन बस रखे इस बात का ध्यान

जिल्ह्यांनुसार मंजूर करण्यात आलेली घरकुले

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत नवीन पात्र असलेल्या 3950 लाभार्थ्यांच्या घरकुल यादी ला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.
त्यासाठीचा निधी देखील उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये पहिली मंजुरी सातारा जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये 31 लाभार्थ्यांची घरकुल सातारा जिल्हा करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 1232 घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला याचप्रमाणे आवश्यक असलेल्या निधीला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1721 लाभार्थ्यांना देखील शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
यासाठी आवश्यक असणाऱ्या 23 कोटी रुपयांचा निधी देखील चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील 440 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील 526 घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

👉घरकुल योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी क्लिक करा👈

gharkul yojana 2024 अशा प्रकारे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि सातारा या पाच जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पात्र झालेल्या 3950 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. या पात्र झालेल्या लाभार्थ्यांची यादी शासन निर्णयासोबत प्रकाशित करण्यात आलेली आहे. यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे ही पाहा : राज्यातील 4975 गावांचा होणार कायापालट


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!