WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pik Vima खरीप पीक विमा 2023 वाटपाबाबत महत्वाचं अपडेट, उर्वरित पीक विमा वाटप सुरू

Pik Vima खरीप पिक विमा 2023 हा अजून पर्यंत पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकरी अजून पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट.

गेल्या वर्षी पावसाने व हवामानाने शेतकऱ्याला दगा दिला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा 2023 चे अर्ज भरले होते. Pik Vima

Agrosolution

खरीप पीक विमा 2023 वाटप अपडेट, या जिल्ह्यात वाटप सुरु

पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिक विमा देताना मध्यावधी नुकसान, पेरणी नंतरचे नुकसान, पेरणी पश्चात नुकसान असेल किंवा इतर कारणांसाठी शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. Pik Vima

गतवर्षी झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्याने मध्यवर्ती नुकसान, पूर्व सूचनांचा पिक विमा, शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर कारणासाठी केलेले क्लेम किंवा अंतिम सरसकट पिक विमा अशा कारणासाठी 7120 कोटी रुपयांचा पिक विमा विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला होता.

Agrosolution

शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ होणार? कर्जमाफीसंदर्भात महत्वाची बैठक

खरीप पिक विमा 2023 अंतर्गत निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी वंचित

मंजूर विमा पैकी अर्ध्यापेक्षा कमी पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे व निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी पिक विम्या पासून वंचित आहेत. सरकारकडून त्यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन पिक विमा कंपन्यांना पीक वाटप संदर्भात निर्देश दिले जात आहेत. Pik Vima

खरीप पिक विमा 2023 पासून वंचित असलेले जिल्हे

त्यामध्ये बीड, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 390 कोटीच्या आसपास पिक विम्याचे वाटप झाले आहे. तरीही मोठ्या संख्येने क्लेम केलेले शेतकरी पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील काही मंडळे हे सरसकट पिक विमा साठी पात्र झाले आहेत पण त्यांना सुद्धा पिक विमा मिळालेला नाही.

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?

बुलढाणा जिल्ह्यासाठी 118 कोटी पिक विमा मंजूर झाला आहे पण त्याच्या सुद्धा पूर्णपणे वाटप झालेले नाही. Pik Vima

बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची स्थिती

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 118 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. बुलढाणा आणि चिखली तालुक्यांतील 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे येलो मोजॅक किंवा इतर कारणांमुळे केलेले दावे पीक विमा कंपन्यांनी बाद केले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दावे अद्याप प्रलंबित

यवतमाळ जिल्ह्यात वैयक्तिक शेतकऱ्यांचे हजारो लाखो दावे अद्याप पीक विमा कंपन्यांद्वारे वाटपासाठी प्रलंबित ठेवले गेले आहेत. या दाव्यांची पुनर्पडताळणी करून लवकरात लवकर वाटप करावे, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधी आणि अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत. Pik Vima

Agrosolution

बॅटरी फवारणी पंप, नॅनो डीएपी, नॅनो युरियासाठी मिळणार 100% अनुदान

नांदेड जिल्ह्यातील पीक विमा वाटप

नांदेड जिल्ह्यात पूर्व सूचना असलेल्या पीक विम्याचे काही प्रमाणात (25%) वाटप झाले आहे, परंतु अनेक महसूल मंडळांतील 25% पीक विमा अद्याप वाटप झालेला नाही. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा लवकरात लवकर वाटप करावे, अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील वाटपाची सुरुवात

आढावा बैठकीनंतर 25 जुलै 2024 पासून बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. परंतु, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.

हिंगोली जिल्ह्याची स्थितीहिंगोली जिल्ह्याचा पीक विम्याचे वितरणही खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. या जिल्ह्याचा लवकरात लवकर मार्ग लावावा अशी अपेक्षा आहे.

Agrosolution

लाडकी बहिण योजनेनंतर शिंदे सरकारचं महिलांना आणखी एक गिफ्ट! मिळणार मोफत 3 सिलेंडर

वरील बातमी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाच्या स्थितीची अद्यतने देते. बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची माहिती शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची आहे.


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!