ST Bus Live Location प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या एमएसआरटीसी ॲपद्वारे प्रवाशांना घरबसल्या लालपरीचे (एसटी) बसचे लाईव्ह लोकेशन मिळणार आहे.
ST Bus Live Location
बस स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार? हा एकच प्रश्न नेहमी सतावत असतो. परंतु आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे. त्यांना हवी असलेली बस कुठे आहे? किती वेळात बस स्थानकावर येणार आहे? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर मिळणार आहे.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
एमएसआरटीसी ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवर एसटी कुठे थांबली? कधीपर्यंत पोचेल? किती वाजता पोचेल? याची माहिती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता व्हेव्हीकल ट्रॅकिंग सिस्टीम व एमएसआरटीसी कॉम्पुटर हे नवीन ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापरही सुरू झाला आहे.
ST Bus Live Location प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने विविध ॲप विकसीत केले आहेत. त्याच धरतीवर एसटी महामंडळाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणेचा वापर करून तयार केलेल्या ॲपद्वारे बसची माहिती प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
वयोवृद्धांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’; 30000 अनुदानंही मिळणार; पात्र, अपात्रतेचे निकष काय?
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नवीन उपक्रमाचा प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.सद्यःस्थितीत बस कुठे आहे हे प्रवाशांना घरबसल्या कळणार असून त्या ॲपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रेकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ वाहनातील बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा दिली आहे. याकरता प्रवाशांना प्ले स्टोअरवर जाऊन एमएसआरटीसी कॉम्प्युटर ॲप डाऊनलोड करावे लागेल.
मराठी आणि इंग्रजी भाषेत ते असल्याने वापरण्यास अतिशय सोपे आहे. अभिप्राय व तक्रारी नोंदवण्याची सोय ऑनलाइन पद्धतीने यात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आनंदाची बातमी, राज्यात अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे लवकरच भरणार…
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या एमएसआरटीसी हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून याचा उपयोग करावा. याशिवाय एसटी महामंडळाच्या अन्य सुविधांचा लाभ घेऊन प्रवाशांनी बस मधूनच सुखकर प्रवास करावा.- रणजीत राजपूत, आगारप्रमुख, जाफराबाद
अशी करता येते तक्रार
मोबाईल ॲपमध्ये तक्रारीसाठी विशेष कॉलम तयार करण्यात आलेला आहे. तक्रारींसाठी प्रवासी वाहक- चालक, बस स्थिती, बस सेवा, ड्रायव्हिंग, मोबाईल ॲप असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी तक्रारदारास मोबाईल व वाहन (एसटी) क्रमांक नोंदवावा लागेल.
सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!
अपघात झाल्यास मिळणार मदत
बसचा अपघात झाल्यास या सेवेमुळे प्रवाशांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध होईल. याशिवाय महिलांना बसमध्ये काही त्रास झाल्यास १०० किंवा १०३ या क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.