WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
onion storage container

onion storage container कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक गोदाम म्हणून कांदा चाळ उभारणी साठी आता मिळणार 1 लाख 60 हजार अनुदान

MGNREGA Kanda chal Anudan yojana 2023

शेतकऱ्यांना सध्या RKVY अंतर्गत कांदा चाळीला अनुदान दिले जाते मात्र प्रती टन 3500 रुपये या दराने दिले जाणारे अनुदान अतिशय तोकडे आहे.

परिणामी शेतकरी गरज असूनही कांदा चाळी बांधत नाहीत.

onion storage container

पीएम किसानचा हप्ता 2 हजाराने वाढणार?

onion storage container राज्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. राज्यात साधारण १३६.६८ लाख मे. टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण ९.४५ लाख हे. क्षेत्र कांदा पिकाच्या लागवडी खाली आहे.

राज्यात खरीप हंगामात काढलेला कांदा लगेच मागणी असल्यास विकला जातो मात्र कमी भाव कमी मागणी असेल तर पर्यायाने त्याची साठवणूक करणे गरजेचे असते. रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो.

स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.

Agrosolution

पी. व्ही.सी.पाईप आणि 5 एच पी 7 एच पी मोटर 90% अनुदान !

कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. onion storage container

हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ‘कांदाचाळ’ या महत्त्वाच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक केली जाऊ शकते.

यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे.

Agrosolution

बिजनेस के लिए सरकार दे रही है 10 लाख रुपए लोन, ऐसे करें आवेदन

या योजने अंतर्गत अकुशल ६० टक्के प्रमाणे ९६ हजार २२० रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल ४० टक्केच्या मर्यादेत ६४ हजार १४७ रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण १ लाख ६० हजार ३६७ रूपये (एक लक्ष साठ हजार तीनशे सदुसष्ठ) इतके अनुदान मिळणार आहे.

उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी शेतकऱ्यांना स्वहिस्सा, लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध करावा लागेल.

कांदाचाळीसाठी एकूण प्रकल्प खर्च – ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार आहे. onion storage container

कांदा साठवण करण्याच्या गोदामाची अर्थात कांदा चाळी ची रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची – – २.९५ मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील.

साधारण एक हे. धारण क्षेत्रावर २५ मे. टन कांदा उत्पादन होते.

कांदा चाळ अनुदान योजना चा लाभ सामुदायिकरित्या शेतकरी घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना देखील या योजनेचा सामुदायिक लाभ घेता येणार आहे. या बाबीचा लाभ गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.

Kanda Chal New GR PDF महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ 


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!