Bajaj CNG bike बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईक आपल्या बाय-इंधन आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्समुळे बाजारात सध्या चर्चेत आहे. या बाईकची किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते.
Bajaj CNG bike
ही बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. एकदा टाकी पूर्ण फुल केली की ही सुचाकी 330 किलोमीटरची रेंज देते, असा दावा कंपनीचा आहे.
ये 7 App घर बैठे देते हैं इन्स्टंट लोन, वो भी सिर्फ 1 से 2 घंटे मे
यातच जर तुम्ही विचार करत असाल की फ्रीडम 125 विकत घ्यावी की नाही? तर या पाच गोष्टींवरून तुम्ही घेऊ शकता निर्णय… Bajaj CNG bike
1. पॉवरफुल इंजिन
बजाज फ्रीडममध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 9.5 पीएस पॉवर आणि 9.7 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. 125cc मध्ये हे एकमेव इंजिन आहे, जे CNG+ पेट्रोलवर काम करते. Bajaj CNG bike इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की, ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगली कामगिरी करू शकते. याच्या एक्झॉस्ट आवाजही बुलेटसारखा असून बाईकप्रेमींना तो खूप आवडतो.
बिना डीजल, धूप से चलता है यह ट्रेक्टर, कीमत भी बेहद कम
2. पेट्रोलवरून CNG वर सहज होते स्विच
बजाज फ्रीडम 125 सीएनजीचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाईकच्या हँडलबारच्या उजव्या बाजूला एक स्विच आहे, फक्त एका क्लिकवर तुम्ही पेट्रोलवरून सीएनजीवर स्विच करू शकता. म्हणजेच कंपनीने ही एक इझी बाईक बनवली आहे.
3. जबरदस्त फीचर्स आणि मायलेज Bajaj CNG bike
बजाज फ्रीडम 125 ही किफायतशीर बाईक आहे. यात 2 लीटरची इंधन टाकी आहे. ज्यामध्ये ही बाईक 130 किलोमीटर धावेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. याशिवाय बाईकमध्ये फक्त 2 किलोचा CNG सिलेंडर देण्यात आला असून तो पूर्ण टाकीवर 200 किलोमीटर धावेल, असा दावाही कंपनीने केला आहे. त्यामुळे एकूणच ही बाईक 330 किलोमीटर (CNG + पेट्रोल) पर्यंत धावेल. ही बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, लॉन्ग सीट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, CNG आणि हँडलबारवरील पेट्रोल स्विच बटण, यूएसबी पोर्ट आणि गियर शिफ्ट इंडिकेटर या सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.
500 रुपयांत महिनाभर दामटा! ही इलेक्ट्रिक कार एक लाखाने झाली स्वस्त
4. सेफ्टी फीचर्स
बजाजच्या नवीन फ्रीडम 125 सीएनजीने 11 सेफ्टी टेस्ट पास केल्या आहेत. 10 टन वजनाचा ट्रक या बाईकवरून गेल्याने या बाईकचे कोणतेही नुकसान झाले नाही, इतकेच नाही तर तिच्या सीएनजी टँकचे कोणतेही नुकसान झाले नाही.
या टाकीला डाव्या आणि उजव्या बाजूला अतिशय मजबूत फ्रेम आहे. टक्कर होऊनही सीएनजी टँकची स्थिती बदलणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. तसेच सीएनजी गॅसची गळती होणार नाही, म्हणजेच ही बाईक रायडरसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. उत्तम ब्रेकिंगसाठी बाईकच्या पुढील टायरमध्ये डिस्क ब्रेक आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेक आहेत.
फीकी पड़ जाएगी मारुति अर्टिगा, किआ ने लॉन्च की बिल्कुल नई 7-सीटर कार, इसमें नया इंजन और फीचर मिलेगा
5. किंमत
बजाज फ्रीडम सीएनजी बाईक तीन प्रकारात उपलब्ध आहे. ही कॅरिबियन ब्लू, सायबर व्हाईट, इबोनी ब्लॅक/ग्रे आणि रेसिंग रेड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याच्या Freedom 125 Disc LED व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये, Freedom 125 Drum LED व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये आणि Freedom 125 Drum व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये आहे.
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.