Agriculture ngo शेतकऱ्यांसाठी (Farmers) राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी (agri) योजना आता एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ (MahaDBT)पोर्टलवरून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
Agriculture ngo
शेतकऱ्यांसाठी (Farmers) राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी (agri) योजना आता एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ (MahaDBT)पोर्टलवरून या योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (Various agricultural schemes under one roof; Benefits can be availed from ‘MahaDBT’ portal)
राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सोयाबीन आणि कापसासाठी 4 हजार कोटींची तरतूद
राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांठी अनेक कृषी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे अनेक जण या योजनांपासून वंचित राहतात. Agriculture ngo अनेकांनी योजनेसाठी अर्ज केलेला असतो. पण त्या अर्जाचे पुढे काय झाले हे ही त्यांना माहित नसते. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सरकार किंवा प्रशासनाला पोहचणेही शक्य नसते. हे ध्यानात घेता आता शासनाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून विविध कृषी योजना एकाच छताखाली आणण्यात आल्या आहेत.
या योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केल्यास या विशेष सेवेअंतर्गत एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर कमी का असतो ?
दरम्यान, सरकारचा हा उद्देश चांगला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाही किंवा ज्यांना तो वापरता येत नाही, त्यांच्यासाठी या योजनेचा म्हणावा तसा लाभ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीमार्फत या योजनांचा प्रसार केल्यास त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला मदत मिळणार आहे. सरकारने त्यावरही भर द्यावा, अशी मागणी काही प्रगतीशील शेतकऱ्यांनी केली आहे. Agriculture ngo
संकेतस्थळावर करा अर्ज
कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची निवड होवून देखील कागदपत्रे अपलोड केले नाहीत, अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ आपले कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या आहेत.
अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 महिलांसाठी विविध योजना
हेल्पलाइनवर साधा संपर्क
संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करताना काही तांत्रिक अडचणी आसल्यास किंवा अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा दूरध्वनी क्रमांक 020-25511479 व [email protected] इमेलवर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Various agricultural schemes under one roof; Benefits can be availed from ‘MahaDBT’ portal)
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.