agri king tractor शेतकऱ्यांना शेती करणं सोपं जावं जास्तीत जास्त उत्पन्न त्याला शेतीमधून घेता यावं याकरता शासन स्तरावरून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व स्वयंचलित उपकरणासाठी अनुदान देण्यात येत आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित अवजारे यावर मिळणार अनुदान त्याकरता अर्ज कोठे आणि कसा करायचा या बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
agri king tractor
मजुरांची उपलब्धता आणि वाढता उत्पादन खर्च यासाठी शेतकरी आता कृषी यांत्रिकीकरणाकडे वळताना दिसत आहे, यात ट्रॅक्टर चालीत लहान अवजारांचा वापर होताना दिसतो, त्यामुळे श्रमाची आणि वेळेची सुद्धा बचत होते. यासाठी शासनाने केंद्र व राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना राबवली आहे. यात कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून दिली जात आहे.
👉 आत्ताच अर्ज करून मिळवा लाभ 👈
योजनेचा मुख्य उद्देश
- शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे agri king tractor
- विभागीय पीक रचनेनुसार व मागणीप्रमाणे पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे
- कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्यावत यंत्रसामग्री वापरासाठी प्रोत्साहित करणे व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे
- याकरता महाराष्ट्रातील सर्व जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहे.
गाय म्हैस गोठा अनुदान योजना साठी अर्ज सुरु; 100% अनुदान मिळणार
लाभार्थी निवडीचे निकष agri king tractor
जिल्ह्यातील प्रवर्ग निहाय खातेदार संख्या पेरणी खालील क्षेत्र, मागील वर्षातील मंजूर कार्यक्रम, आणि मागील 6 वर्षांमधील खर्च विवरण विचारात घेऊन जिल्हा निहाय लक्षांक देण्यात येत असतात. याकरता इच्छुक शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात.
लाभार्थ्यांची निवड पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने जेष्ठताक्रम नुसार निश्चित करून ही पूर्वसंमती अर्ज खरेदी करता देण्यात येत असते आणि लाभार्थी निवड ते अनुदान अदायगीपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असते, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी असणं अनिवार्य आहे
👉महिला बचत गटांना शेळी गट वाटप👈
योजनेचा स्वरूप
- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित कृषी यंत्र व अवजारे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.
- यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, पावर टीलर, स्वयंचलित यंत्र, ट्रॅक्टरचलित अवजारे, ट्रॅक्टरचे पीक संरक्षण अवजारे व पीक काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रिया करणारी जी अवजार असतात यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- सर्वसाधारणपणे किमतीच्या 40 ते 50 टक्के किंवा केंद्र शासनाने घोषित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदाना शेतकऱ्यांना विचारीत करण्यात येत असते. कृषी अवजारे व बँकेच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या 40% अनुदान देण्यात येते.
- योजनेची अंमलबजावणी ही पूर्वसमंती नंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून खरेदीची मुभा देण्यात येते. agri king tractor
- आणि खरेदी केल्यानंतर त्याची बिले शेतकऱ्यांना ऑनलाईन जमा करावे लागत असतात.
- त्यानंतर अमाऊंट ही त्यांच्या बँक खात्यामधून चेक डीडी किंवा ऑनलाईन पद्धतीने देयकाची रक्कम ही अदा केली जाते.
- थेट लाभ हस्तांतरण हा (डीबीटी) वेबसाईटच्या पद्धतीचा अवलंब करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात असते.
या योजनेचा लाभ घेऊन मोफत सिलेंडर मिळवा, प्रक्रिया काय?
अर्ज पद्धत agri king tractor
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण महाडीबीटी पोर्टल वर भेट देऊ शकता.
- किंवा आपल्या गावात असलेले सेतू किंवा आपल्या सेवा केंद्रामध्ये जाऊनही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
- आणि जर घरामध्ये तरुण मुलं असतील तर त्यांच्याकडूनही महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता.
- आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या जवळील कृषी सहाय्यक असतील, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही अर्जाची प्रक्रिया पुढे पार पाडू शकतात.
👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👈
Discover more from Agrosolution
Subscribe to get the latest posts sent to your email.