WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Amazon bajaj quiz बजाज फ्रीडम 125 चा मार्केटमध्ये जलवा, आठवड्याभरात पार केली 6 हजारांपेक्षाची जास्त बुकिंग

Amazon bajaj quiz एकीकडे मार्केटमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बाईक लाँच होत असतानाच, नुकतेच बजाजने विश्वातील पहिली CNG बाईक लाँच केली. याच कारणामुळे ही बाईक लोकांच्या कुतूहलाचा विषय बनली होती. परंतु आता याच कुतूहलाचे रूपांतर विक्रीमध्ये झाले आहे.

भारत नवनवीन कार्स, बाईक्स आणि स्कुटर्स लाँच होताना दिसत आहे. कधी कुठली इलेक्ट्रिक कार लाँच होते तर कधी बाईक. पण चर्चा तर तेव्हा झाली जेव्हा चक्क बजाज कंपनीने जगातील पहिली CNG बाईक मार्केटमध्ये लाँच केली. गेल्या अनेक दिवसांपासून या बाईकची चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत होती. CNG बाईकची असणारी क्रेझ त्यात असणारे कुतूहल, या बाईकला ग्राहकांची पसंती मिळवून देत आहे Amazon bajaj quiz

Agrosolution

सोने खरेदीची सुवर्णसंधी! दरात झाली मोठी घसरण, सोन्याचा दर 64 हजार रुपयांपेक्षा कमी

6 हजार ग्राहकांची पसंत

बजाज ऑटोने सांगितले होते की ही बाईक लाँच होण्यापूर्वीच अनेक खरेदीदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच जेव्हा ही बाईक भारतीय बाजारपेठेत आली तेव्हा 30,000 हून अधिक लोकांनी यात स्वारस्य व्यक्त केले होते. बजाजने हे देखील सांगितले आहे की त्यांना सीएनजी बाइकसाठी सुमारे 6,000 बुकिंग आधीच मिळाले आहेत. फ्रीडम 125 ची बुकिंग 18 जुलैपासून सुरू झाली असून तुम्ही 1,000 रुपये टोकन रक्कम भरून ही बाईक बुक करू शकता.

व्हेरिएन्ट आणि किंमत

बजाज ऑटोने फ्रीडम सीएनजी बाईक तीन व्हेरिएन्ट मध्ये उपलब्ध करून दिली आहे. एंट्री-लेव्हल ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 (एक्स-शोरूम) रुपये आहे, तर मिड-व्हेरिएंट ड्रम LED ची किंमत 1.05 लाख(एक्स-शोरूम) रुपये आहे. तसेच CNG बाईकच्या टॉप-एंड डिस्क LED व्हेरिएन्टची अन्य व्हेरिएन्टपेक्षा 5,000 रुपयाने जास्त आहे. Amazon bajaj quiz

Agrosolution

लाडकी बहिण योजनेनंतर शिंदे सरकारचं महिलांना आणखी एक गिफ्ट! मिळणार मोफत 3 सिलेंडर

इंजिन

बजाज फ्रीडममध्ये 125 CC इंजिन आहे, जे 9.4 बीएचपी पॉवर आणि 9.7 एनएम पीक टॉर्क निर्माण करू शकते. बाईकमध्ये पेट्रोलसाठी 2-लिटरची इंधन टाकी आणि सीटखाली 2 किलो CNG टाकी लावण्यात आली आहे.

मायलेज

बजाज कंपनीचे असे म्हणणे आहे की CNG वर चालताना बाईक 102 किमी/किलो आणि पेट्रोलवर चालताना 64 किमी/लिटर मायलेज देऊ शकते, . पेट्रोल आणि CNG मायलेजसह, बाइक 330 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. याच तगड्या मायलेजमुळे अनेक ग्राहकांचे हात ही बाईक विकत घेण्यासाठी सरसावत आहे.

Agrosolution

महिलांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी ही योजना काय? त्यासाठी अर्ज कसा करावा?


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!