WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
animal care clinic 2024 पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नयेत म्हणून काय करावं?

animal care clinic सध्याच्या बदलत्या हवामानानुसार जनावरांचा आहार आणि गोठ्यात बदल करणे गरजेचे असते. त्यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत पावसाळा सतत सासणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो यामुळे जीवाणू आणि विषाणूजन्य वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. या काळामध्ये जनावरांमध्ये घटसर्प, लाया, खुरकूत पऱ्या हे आजार होतात. संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. गाभण जनावरे व वासरांकडे लक्ष द्यावे पावसाळी वातावरणात जनावरांची कशी काळजी घ्यावी या विषयाची सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

animal care clinic

नावरांना पावसाळ्यात घटसर्प, लाया, खुरकूत, फर्या यांसारख्या आजार होतात. नव्या हिरव्या चाऱ्यामुळे पोट फुगे, जंताचा प्रादुर्भाव होतो. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो गोचीड माशांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढते.

animal care clinic

👉मुर्गी और बकरी के लिए भी मिलेगा लोन…जानिए कैसे करते हैं अप्लाई👈

पावसाळ्यात जनावरांचा आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचं

  • पावसाच्या सुरुवातीला आजारांवर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
  • वेळोवेळी पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • पावसाळा जनावरांना चरायला सोडायचे असल्यास आलटून पाठवून विविध ठिकाणी चारावेत.
  • शेतातील उभे गवत चारा ओलसर असेल किंवा त्यावर पाण्याचे थेंब असतील तर जनावर असा चारा आवडीने खात नाही.
  • पाऊस पडला नंतर चारावरील पाणी हटवल्यानंतर जनावरांना चरायला सोडावे.
  • पावसाळ्यात लहान वासरे करडांना बाहेर पावसात जास्त वेळ भिजू देऊ नये.
  • पावसात भिजल्यामुळे निमोनिया होण्याचे शक्यता असते.
  • पावसाळ्यात पशुखाद्याचा जास्त दिवस साठा करू नये. animal care clinic

हे ही पाहा : बजाज लाया दुनिया की पहली सीएनजी बाइक, CNG पर मिलेगी 200 किमी की रेंज

अशी घ्या काळजी

  • animal care clinic पशुखाद्य कोरड्या जागी ठेवण्याची सोय करावी जेणेकरून पशुखाद्यास बुरशी लागणार नाही.
  • बुरशी युक्त खाद्य जनावरांना खाण्यास देऊ नये.
  • गोठ्यातील जमिनीवर ओलसरपणा आणि शेण आणि लेंडांचा थर असल्यास कॉक्सिडीया या रोगाचा प्रादुर्भाव लहान वासरांना करडांना होण्याची शक्यता असते.
  • म्हणून गोठ्यातील जमीन खरडून शेण, लेंड्या पूर्णतः काढाव्यात जमीन कोरडी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
  • गोट्याभोवती पाणी साठणार नाही दल दल होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कारण यातूनच माशा, डास, कीटक यांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • जनावरांचे आरोग्य बिघडून दूध उत्पादन कमी होते.
  • गोठ्यात दल दल झाल्यास गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • त्यांच्यामार्फत यकृत कृमीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
  • चारांच्या गव्हाणे दररोज स्वच्छ करून घ्याव्यात कारण शिल्लक साऱ्यावर नियमित चारा टाकत गेल्यास गव्हाणीत बुरशीची वाढ होते. animal care clinic
  • चाराचा कुबट वास येतो त्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.

👉पाहा सविस्तर माहिती👈

animal care clinic

  • गोठ्यामध्ये जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावा त्यामुळे गोठा जंतू विहिरीत राहण्यास मदत होते.
  • लहान वासरे करडे यांना उबदार जागेवर बांधावे बसण्यासाठी वाळलेले गवत पाचट किंवा पोत्याचा वापर करावा.
  • गोठ्यात ओलसरपणा जास्त प्रमाणात राहिल्यास यामध्ये जंतूची वाढ झपाटणे होते.
  • त्यामुळे कासेला जंतुसंसर्ग होऊन कास सुजी होते.
  • बसण्यासाठी वाळलेले गवत, पाचट किंवा पोत्यांचा वापर करावा.
  • गोठा कोरडा राहील याची काळजी घ्यावी.
  • दूध काढून झाल्यानंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवावे.
  • त्यामुळे सडात होणारा जंतुसंसर्ग टाळता येतो.
  • पावसाळ्यामध्ये जनावरांना नुसता हिरवा चारा न देता आहारात कोरड्या चारासह खनिज मिश्रणाचा समावेश करावा.
  • फक्त कोळा हिरवा चारा खाल्ल्यामुळे जनावरांमध्ये पोट फुगे सारख्या समस्या उद्भवतात.
  • अशा प्रकारे जनावरांची काळजी घेतल्यास अनेक रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.

हे ही पाहा : कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र 

हे ही पाहा : सावकाराकडे व्याजाने पैसे घेण्याची गरज नाही, शेतीकामांसाठी 2.5 लाखापर्यंत अनुदान


Discover more from Agrosolution

Subscribe to get the latest posts sent to your email.

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now
error: Content is protected !!